परभणी :१५ हजार मतदारांना नवीन ओळखपत्र मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:49 IST2019-09-25T23:48:21+5:302019-09-25T23:49:04+5:30
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, वगळणी आणि यादीतील सुधारणांचे काम करण्यात आले असून, या अंतर्गत १५ हजार ७८६ नवीन मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिली़

परभणी :१५ हजार मतदारांना नवीन ओळखपत्र मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, वगळणी आणि यादीतील सुधारणांचे काम करण्यात आले असून, या अंतर्गत १५ हजार ७८६ नवीन मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिली़
निवडणूक विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला़ या कार्यक्रमांतर्गत जिंतूर विधानसभा मतदारसंघात ३ हजार ९७, परभणी मतदार संघात ३ हजार ८५८, गंगाखेड विधानसभा मतदार संघात ६ हजार ९ असे एकूण १५ हजार ७८६ मतदारांना नवीन मतदान ओळखपत्राचे वाटप बीएलओमार्फत करण्यात येत आहे़ १ जानेवारी २०१९ च्या अर्हता दिनांकावर घेण्यात आलेल्या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्यात आल्या असून, जिल्ह्यातील १३ हजार ७१२ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे़
शस्त्र जमा करण्याचे आवाहन
४विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात शस्त्र परवानाधारकांकडून त्यांच्याकडील शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्यात यावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़
४या संदर्भात छाननी समितीची बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत काही परवानाधारकांना निवडणूक कालावधीत शस्त्र जमा करण्यापासून सवलत देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे़
४त्यामुळे संबंधित शस्त्र परवानाधारकांनी त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाकडे अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे़