परभणी: ३३ वाहनधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:18 AM2019-08-03T00:18:24+5:302019-08-03T00:18:32+5:30

शहरात कारेगाव रस्त्यावर नवा मोंढा पोलिसांनी दुचाकी तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत ३३ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Parbhani: ३३ Action on vehicle holders | परभणी: ३३ वाहनधारकांवर कारवाई

परभणी: ३३ वाहनधारकांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरात कारेगाव रस्त्यावर नवा मोंढा पोलिसांनी दुचाकी तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत ३३ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कारेगाव रस्त्यावर पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, शिवाजी बोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वाहनधारकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मूळ कागदपत्रे नसणे, नंबर चुकीच्या पद्धतीने टाकणे आदी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत ३३ वाहनधारकांवर कारवाई करुन ८ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे उपनिरीक्षक वाघमारे यांनी सांगितले. या मोहिमेत पोलीस कर्मचारी प्रभाकर बाजगीर, प्रशांत दीपक, गौतम ससाणे, सुरजोशी, सपकाळ आदींनी सहभाग घेतला.
कौसडी फाट्यावर विशेष पथकाची दमदाटी
४बोरी- जिंतूर तालुक्यातील बोरी ठाण्याअंतर्गत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाद्वारे शुक्रवारी कौसडी फाट्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.
४या तपासणी दरम्यान पथकातील कर्मचाऱ्यांनी दमदाटी केल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशावरुन सुरक्षित वाहतुकीसाठी विशेष पथकाद्वारे तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
४हे पथक २ आॅगस्ट रोजी बोरी येथील कौसडी फाट्यावर जिंतूर- परभणी रस्त्यावरील वाहनधारकांची तपासणी करीत होते. या पथकाने जवळपास १०० हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली. पण त्याचवेळी दुचाकीस्वारांना दमदाटी करणे, धावत्या दुचाकीची चावी काढून घेणे तसेच कागदपत्र दाखवण्याच्या नावाखाली वाहनधारकास उद्धट तसेच आरोपीप्रमाणे वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला़
पोलिसांच्या या भूमिकेचा वाहनधारकांनी संताप व्यक्त केला. या कारवाईत प्रत्येक वाहनाकडून २०० रुपये दंड आकारणी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारकड यांनी दिली.

Web Title: Parbhani: ३३ Action on vehicle holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.