शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ७२ तलाव कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:27 IST

तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव असे एकूण ७२ छोटे तलाव कोरडेठाक पडले आहेत. येलदरी, सिद्धेश्वर व निवळी या प्रकल्पात पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात तालुक्याची भीषण दुष्काळाकडे वाटचाल होत आहे.

विजय चोरडिया ।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव असे एकूण ७२ छोटे तलाव कोरडेठाक पडले आहेत. येलदरी, सिद्धेश्वर व निवळी या प्रकल्पात पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात तालुक्याची भीषण दुष्काळाकडे वाटचाल होत आहे.जिंतूर तालुक्यामध्ये यावर्षी २७८.५ मि.मी. एवढा पाऊस झाला. या पावसाची सरासरी ३४ टक्के आहे. ेआजपर्यंत किमान ५३९ मि. मी. पाऊस होणे आवश्यक होते. तालुक्यातील ओढे, नाले अजूनही कोरडेठाक आहेत. जिंतूर तालुक्यामध्ये लघूसिंचन विभागांतर्गत १६ सिंचन तलाव असून २३ पाझर तलाव आहेत. २० गावांमध्ये तलाव आहेत. यापैकी तालुक्यातील एकाही तलावात जेमतेम सुद्धा पाणी नाही. रायखेडा, डोंगरतळा, भोगाव, चामनी, वरुड, हलविरा या तलावात ५ टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर ४९ तलावामध्ये ० टक्केही पाणीसाठा नाही. अशीच परिस्थिती लघूपाटबंधारे विभागाच्या तलावांमध्ये आहे. या तलांवामध्ये जेमतेम सुद्धा पाणी नाही. परिणामी भविष्यातील दुष्काळ डोळ्यासमोर दिसत आहे. तालुक्यात मागील ३ वषार्पासून अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. त्यातच यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने भविष्यामध्ये बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. त्याच बरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. याकडे शासन गांभीयार्ने पाहत नाही.जिंतूर तालुक्यामध्ये येलदरी मध्यम या प्रकल्पामध्ये अद्याप ० टक्के सुद्धा पाणीसाठा नाही. या धरणाखाली असणाºया सिद्धेश्वर धरणाची अवस्थाही वाईट आहे. येथेही ० टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. ज्या धरणावर येलदरी धरण अवलंबून आहे. त्या खडकपुर्णा धरणात सुद्ध हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता येलदरी धरण भरणार तरी कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. मागील ५ वषार्पासून अशीच परिस्थिती आहे. येलदरी धरणामध्ये ० टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे;परंतु, त्यातही १८ टक्के गाळ आहे. त्यामुळे नेमका पाणीसाठा किती? हे पाटबंधारे विभाग सुद्धा सांगू शकत नाही. त्यामुळे तालुकावासिय हैराण झाले आहेत.पाच शहर २०० गावांना बसणार फटका४येलदरी व सिद्धेश्वर धरणातून जिंतूर, परभणी, वसमत, हिंगोली, नांदेड या मुख्य शहरासह लगत असणाºया २०० पेक्षा अधिक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. धरणात पाणी नसल्याने भविष्यामध्ये या शहरांना व गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.४याच धरणाच्या पाणीपातळीवर शहराचे भवितव्य अवलंबून आहे. येलदरी, सिद्धेश्वर या धरणावर अनेक गावे व शहरे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. धरणात पाणीसाठा नसल्याने या धरणाचा पाणीसाठा पिण्यासाठी तातडीने राखीव करायला पाहिजे.४ भविष्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहू शकते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्याच बरोबर जनावरांच्या चाºयाचे व पिण्याच्या पाण्याचे प्रशासनाने नियोजन करणेही आवश्यक आहे.येलदरीत शुन्य टक्के पाणी४येलदरी धरणात किमान मृतसाठ्याची अपेक्षा आहे. म्हणजेच ० टक्के पाणी येण्यासाठी साधारणत: ४ ते ५ मीटर पाण्याची गरज आहे. ५ मीटर पाणी आल्यानंतर येलदरी धरण ० टक्के होईल. तर खडकपूर्णा धरण ० टक्के होण्यासाठी ३ मीटर पाणी कमी आहे. हे धरण भरल्यानंतर येलदरीत पाणी येईल हीच परिस्थिती येलदरीच्या खाली असणाºया सिद्धेश्वर धरणाची आहे.पर्जन्यमान घटले४यावर्षी जिंतूर तालुक्यात केवळ ३४ टक्के पाऊस पडला. सरासरी ८११.१० मि.मी. एवढी नोंद आहे. २१ आॅगस्टपर्यंत २७८.५ मि.मी. एवढा पाऊस झाला. प्रत्यक्षात तो किमान ५३९ मि.मी. होणे अपेक्षित आहे.४येलदरी धरण क्षेत्रात १५० मि.मी., सिद्धेश्वर धरण क्षेत्रात ४३२ मि.मी. तर खडकपूर्णा धरण क्षेत्रात ३०५ मि.मी. पाऊस पडला आहे. अपेक्षित पर्जन्यमान नसल्याने धरणामध्ये पाणीसाठा वाढू शकला नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीdroughtदुष्काळ