परभणी : २९ लाखांचे कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:16 IST2018-12-13T00:15:16+5:302018-12-13T00:16:21+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्र्गत १० डिसेंबरपर्यंत ४० शेतकऱ्यांना २९ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना हक्काचा पैसा उपलब्ध झाला आहे.

परभणी : २९ लाखांचे कर्ज वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेंतर्र्गत १० डिसेंबरपर्यंत ४० शेतकऱ्यांना २९ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना हक्काचा पैसा उपलब्ध झाला आहे.
आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने सुगीच्या काळात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला जातो. परिणामी बाजारभाव कमी होतात. शेतमालास योग्य भाव न मिळाल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. काढणी हंगामात शेतमालाची साठवणूक करून काही कालावधीनंतर तो बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास ज्यादा भाव मिळू शकतो. शेतकºयांना सुगीच्या काळात असलेली आर्थिक निकड लक्षात घेऊन गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळ शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.
मानवत बाजार समितीनेही या योजनेची अंमलबजावणी केली असून शेतमाल तारण ठेवल्यास बाजार भावानुसार सहा महिन्यांच्या मुदतीसाठी ६ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. या कर्जाचा भरणा १८० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. चालू वर्षाचा सातबारा, शेतमालाचे पीकपेरा पत्र, १०० रुपयांचा बॉम्ड आदी कागदपत्र जमा करून बाजार समितीकडे सादर केल्यास कर्ज उपलब्ध करून दिले जाते. १० आॅक्टोबर ते १० डिसेंबर या काळात बाजार समितीकडे ४० शेतकºयांनी २ हजार २५५ सोयाबीन कट्टे तारण ठेवले असून या शेतकºयांना २९ लाख ६४ हजार ३०० रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी पणन मंडळाने १७ लाख ३४ हजार रुपये उपलब्ध करून दिले असून उर्वरित १२ लाख रुपये बाजार समितीने उपलब्ध केले आहेत.
६ टक्के व्याज दराने कर्ज
या योजनेंतर्गत बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के रक्कम सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज म्हणून दिली जाते. ही योजना पणन मंडळाच्या स्वनिधीतून बाजार समित्यांमार्फत राबविली जाते. सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाºया बाजार समित्यांना ३ टक्के व्याज सवलत पणन मंडळाकडून दिली जाते. तसेच ज्या बाजार समित्या स्वनिधीतून कर्ज योजना राबवितात त्या बाजार समित्यांना वाटप केलेल्या कर्जरकमेवर ३ टक्के व्याज सवलत अनुदान स्वरुपात दिले जाते.
कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने शेतमाल तारण ठेऊन नाममात्र ६ टक्के दराने सहा महिने मुदतीचे कर्ज बाजार समितीने उपलब्ध करून दिले आहे. शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
-गंगाधरराव कदम,
सभापती कृऊबा, मानवत
शेतमाल तारण योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या शेतकºयांना १८० दिवसांच्या आत कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. शेतकºयांची निकड लक्षात घेऊन बाजार समितीने ही योजना सुरू केली आहे.
-शिवनारायण सारडा,
प्रभारी सचिव