शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अनुदानासाठी २२०० प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:44 IST

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुदानावरील घटकांसाठी १ जूनपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडृून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २२०० प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुदानावरील घटकांसाठी १ जूनपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडृून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २२०० प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.जिल्ह्यातील शेतकºयांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतीतून उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत. आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकºयांना उभारी देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास अभियान राबविण्यात येत आहे.या अंतर्गत शेतकºयांना शेती करताना लागणारी यंत्र सामुग्री व शेतीपूरक घटक खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येत आहे. त्याचा शेतकºयांना पेरणीसाठीही लाभ होतो.गतवर्षी या योजनेला जिल्ह्यात शेतकºयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राज्य शासनाने ही योजना यावर्षीही चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकºयांकडून मुदतीत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०१८-१९ साठी जिल्ह्यातील शेतकºयांकडून १ जूनपासून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. २० जूनपर्यंत प्रस्ताव सादरीकरणासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र आॅनलाईनच्या सर्व्हर डाऊनमुळे शेतक्यांना या योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल करण्यास अडचणींचा सामना करावा लागला.या योजनेचा वाढता प्रतिसाद पाहता राज्य शासनाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.या घटकांसाठी अनुदानफूल, मसाला पिके, हळद, आळिंबी उत्पादन प्रकल्प, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती- हरितगृह, शेडनेट हाऊस, उच्च प्रतिची भाजीपाला लागवड, फुल पिके लागवड, प्लास्टिक मल्चींंग, ट्रॅक्टर २० अश्व शक्तीपर्यंत, पीक संरक्षण उपकरणे, एकात्मिक पॅक हाऊस, शीत खोली, पूर्व शीतकरणगृह, शीतगृह, एकात्मिक शीतसाखळी, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदा चाळ उभारणी, मधुमक्षिका पालन, मधुमक्षिका वसाहत व संच वाटप या १९ घटकांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकºयांना अनुदान दिले जाते.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीonionकांदाfruitsफळे