परभणी : भूसंपादनासाठी ६८ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:31 AM2020-02-15T00:31:17+5:302020-02-15T00:31:56+5:30

कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरुन जाणाऱ्या १४.१५ कि.मी. अंतराच्या बाह्य वळण रस्त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्रालयाच्या अव्वर सचिवांनी भूसंपादनासाठी ६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून भूसंपादनाअभावी रखडलेल्या रस्त्याच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

Parbhani: 2 crore sanctioned for land acquisition | परभणी : भूसंपादनासाठी ६८ कोटी मंजूर

परभणी : भूसंपादनासाठी ६८ कोटी मंजूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरुन जाणाऱ्या १४.१५ कि.मी. अंतराच्या बाह्य वळण रस्त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्रालयाच्या अव्वर सचिवांनी भूसंपादनासाठी ६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून भूसंपादनाअभावी रखडलेल्या रस्त्याच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
कल्याण- निर्मल हा ६१ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग परभणी जिल्ह्यातून जातो. हाच मार्ग परभणी शहरातून पुढे नांदेडकडे जात आहे. शहरातील वाढत्या वसाहती लक्षात घेता आणि शहराच्या विकासासाठी बाह्य वळण रस्ता मंजूर झाला आहे. मागील सहा-सात वर्षापासून या रस्त्याच्या निर्मितीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर थ्री ए, थ्री डी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून रस्त्यासाठी संपादित करावयाच्या जमिनीचे क्षेत्र, मूल्यांकन निश्चितीकरणाचे कामही पूर्ण करण्यात आले. त्यानंतर जमीन संपादनासाठी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून ७० कोटी ९ लाख ५७ हजार २०१ रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्रालयाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव पाठवूनही साधारणत: एक वर्षाचा कालावधी लोटला; परंतु, त्यास निधी उपलब्ध होत नसल्याने काम ठप्प पडले होते. अखेर १३ फेब्रुवारी रोजी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्रालयाने या रस्त्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी ६८ कोटी १ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २०२१ पर्यंत जमीन संपादन करण्याची मूदत दिली असून शेतकऱ्यांना त्यांचा मावेजा थेट बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. निधी मंजूर झाल्याने बाह्यवळण रस्त्याच्या निर्मितीमधील मुख्य अडथळा दूर झाला असून कामाला गती मिळेल, अशी आशा आहे.
५ गावच्या : शिवारातील जमिनी
४पाथरी रस्त्यावरील सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यायाच्या परिसरातून निघालेला हा बाह्यवळण रस्ता पुढे असोला गावाजवळ वसमत रस्त्याला मिळणार आहे. १४.७५ कि.मी. अंतराचा हा बाह्य वळण रस्ता असून या रस्त्यासाठी पारवा, धर्मापुरी, परभणी, वांगी आणि असोला या पाच गावांच्या शेत शिवारातील जमीन संपादित करावयाची आहे. त्यासाठी हा निधी प्राप्त झाला आहे.
८४.४५ हेक्टर जमिनीचे होणार संपादन
४या रस्त्याच्या निर्मितीसाठी ८४.४५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात पारवा शिवारामध्ये १.७६ हेक्टर जमीन, धर्मापुरी १०.७४, परभणी ४२.१५, वांगी १५.८९ आणि असोला शिवारातील १३.९१ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. भूसंपादनाच्या मूल्यांकन, शेतकºयांची यादी या सर्व बाबी पूर्ण झाल्या असून निधी प्राप्त झाल्याने मावेजा वितरणाचे काम सुरु होणार आहे.
७ वर्षांपासून पाठपुरावा
४बाह्य वळण रस्त्याच्या निर्मितीसाठी येथील प्रविण देशमुख यांनी मागील सात वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी लावून धरली. अखेर त्यास यश आले. याकामी जिल्हाधिकारी कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि मुंबई येथील अधिकाºयांचे सहकार्य लाभले. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी निधी मंजूर झाल्याने रस्ता निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून परभणी शहराच्या विकासालाही चालना मिळेल, असे प्रविण देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Parbhani: 2 crore sanctioned for land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.