परभणी : पोटनिवडणुकीसाठी ७ अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 23:51 IST2020-01-22T23:50:58+5:302020-01-22T23:51:41+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक १४ अ च्या पोट निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली़ त्यात ८ पैकी ७ अर्ज वैध ठरले आहेत़

परभणी : पोटनिवडणुकीसाठी ७ अर्ज वैध
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक १४ अ च्या पोट निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली़ त्यात ८ पैकी ७ अर्ज वैध ठरले आहेत़
या पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ त्यातील एक अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे़
वैध ठरलेल्या अर्जांमध्ये सय्यद महेबुब अली सय्यद अहमद अली (राष्ट्रवादी काँग्रेस), सय्यद हारिस अली सय्यद महेबुब अली (अपक्ष), सय्यद आबेद सय्यद उस्मान(अपक्ष), बेगम शबाना अलीमोद्दीन (अपक्ष), खान शहनाजबी अकबर खान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), खान मोहसीन अहमद (अपक्ष), सतीश भाऊराव फटके (शिवसेना) यांचा समावेश आहे़ २४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत असून, २५ जानेवारी रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे़ ६ फेबु्रवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे़