संतोष मगर परभणी: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजता जिल्ह्यातील १२७८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी रोडवलेली गर्दी दुपारी मात्र केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारी दीड वाजेपर्यंत ३९.६५ टक्के मतदान झाले.
परभणी जिल्ह्यातील ५४ जिल्हा परिषद गट व १०८ पंचायत समिती गणासाठी शनिवारी मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील १२७८ मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळपासूनच ग्रामीण विविध मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी रोडावलेली मतदारांची संख्या दुपारनंतर वाढल्याचे दिसून आले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८.९२ टक्के मतदान झाले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत जिंतूर मध्ये ३८.३९ टक्के, परभणी ४०.०६, मानवत ३७.५६, सेलू ४३.१९, पाथरी ४०.०८, सोनपेठ, ३८.७७, पूर्णा ४१.६३, पालम ३९.७४, गंगाखेड ३७.४५ टक्के मतदान झाले असून सरासरी जिल्ह्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ३९.६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मतदान केंद्र बाहेर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
९ ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाडजिल्ह्यात ९ ठिकाणी मतदान मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया काही वेळ थांबली होती. मात्र वेळीच दुरुस्ती केल्याने मतदान प्रक्रिया पूर्ववत झाली.
Web Summary : Parbhani district council elections saw 39.65% voter turnout by 1:30 PM. Voting began smoothly at 1278 centers, with queues increasing after noon. Nine EVMs experienced technical glitches, but were quickly resolved, allowing voting to resume.
Web Summary : परभणी जिला परिषद चुनावों में दोपहर 1:30 बजे तक 39.65% मतदान हुआ। 1278 केंद्रों पर मतदान शांतिपूर्वक शुरू हुआ, दोपहर बाद कतारें बढ़ीं। नौ EVM में तकनीकी खराबी आई, लेकिन उन्हें तुरंत ठीक कर दिया गया, जिससे मतदान फिर से शुरू हो सका।