शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

'डीपीडीसीची कामे अन् पक्षातील बढतीचा शब्द अखेर कामी'; परभणीत ७८ उमेदवारांची माघार

By मारोती जुंबडे | Updated: January 27, 2026 19:36 IST

Parabhani ZP Election 2026:स्वपक्षाविरोधात बंडखोरी करून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी पक्षनेत्यांनी अखेरचे प्रयत्न केल्याचे चित्र होते.

- मारोती जुंबडेपरभणी : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. जिल्हा परिषदेच्या दहा गटांसह पंचायत समितीच्या २० गणांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीतून ३२, तर पंचायत समिती निवडणुकीतून ४६ अशा एकूण ७८ उमेदवारांनी माघार घेतली.

स्वपक्षाविरोधात बंडखोरी करून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी पक्षनेत्यांनी अखेरचे प्रयत्न केल्याचे चित्र होते. शासकीय समित्यांवर स्थान, पक्षातील महत्त्वाची पदे तसेच डीपीडीसीअंतर्गत विकासकामे मिळवून देण्याची आश्वासने देत बंडखोरांना माघारीसाठी राजी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या सर्व हालचाली मंगळवारी परभणी तहसील कार्यालय परिसरात ठळकपणे पाहायला मिळाल्या. आत्ता माघार घ्या, पुढील काळात संधी दिली जाईल हा जुना राजकीय फॉर्म्युला यावेळी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. कामे आणि पक्षातील बढतीचा शब्द कामी आल्याने अनेक बंडखोर उमेदवारांनी अखेर माघार घेतल्याचे चित्र दिसून आले.

झरी, पिंगळी, सिंगणापूर, पोखर्णी गटांत पक्षीय उमेदवारांची माघारजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी झरी, पिंगळी, सिंगणापूर व पोखर्णी परिसरात पक्षीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. विविध पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने संबंधित गट व गणांतील निवडणूक लढतींचे चित्र बदलले आहे.

झरी पंचायत समिती गण व साडेगाव पंचायत समिती गणातून शिंदेसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्याचप्रमाणे पिंगळी जिल्हा परिषद सर्कलसह पंचायत समिती गणातून उद्धवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली. दरम्यान, सिंगणापूर जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष व शिंदेसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतली असून, पोखर्णी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. या माघारीमुळे संबंधित गट व गणांमध्ये निवडणूक लढत नव्याने रंगण्याची शक्यता असून आता अपक्ष उमेदवारांना पक्षीय पाठिंबा दिला जाणार की अधिकृत नावाने निर्णय जाहीर केला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीतून ३२ जणांची माघारजिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरलेल्या ३२ अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली. यामध्ये झरी जिल्हा परिषद सर्कलमधून १, टाकळी बोबडे ४, टाकळी कुंभकर्ण ६, पेडगाव २, जांब १, पिंगळी ३, सिंगणापूर ३, पोखर्णी ३, लोहगाव २ तर दैठणा जिल्हा परिषद गटातून २ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता दहा जिल्हा परिषद गटांसाठी ५६ उमेदवार रिंगणात आहेत.

पंचायत समिती निवडणुकीतून ४६ जणांची उमेदवारी परतजिल्हा परिषद पाठोपाठ पंचायत समिती निवडणुकीतूनही मंगळवारपर्यंत ४६ उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये झरी पंचायत समिती गणातून ४, साडेगाव ५, नांदगाव १, टाकळी कुंभकर्ण ९, नांदापूर ५, पेडगाव १, आर्वी २, जांब २, पिंगळी ३, असोला १, ब्राह्मणगाव १, पोखर्णी २, ब्रह्मपुरी १, लोहगाव २, उखळद २ तर धसाडी पंचायत समिती गणातून एक उमेदवार माघारी फिरला आहे. त्यामुळे आता पंचायत समितीच्या गणांमध्ये ९३ उमेदवार रिंगणात उरले आहेत.

अधिकृत उमेदवारांचा मार्ग मोकळाया माघारीमुळे अनेक गट व गणांमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेर आश्वासनांची रणनिती यशस्वी ठरल्याने अधिकृत उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे चित्र असून, परभणी तालुक्यातील निवडणूक रणधुमाळी आता अधिकच चुरशीची होत चालली आहे.

टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५parabhaniपरभणीElectionनिवडणूक 2026