शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस थांबता थांबेना, आवक वाढल्याने येलदरी धरणातून पूर्णा नदीत ११ हजार क्युसेक्स विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:27 IST

येलदरी धरण १५ ऑगस्ट २०२५ रोजीच पूर्ण क्षमतेने भरले होते आणि तेव्हापासून सुरू असलेले पूर नियंत्रण आजही सुरूच आहे.

येलदरी वसाहत (परभणी): यावर्षीच्या पावसाळ्याने पाठ सोडली नसल्यामुळे परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाची आवक दररोज वाढतच आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग नियंत्रित करताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली आहे. धरणातून गुरुवारी दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला होता, आता आज (३० ऑक्टोबर) पुन्हा दोन दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे.

येलदरी धरण १५ ऑगस्ट २०२५ रोजीच पूर्ण क्षमतेने भरले होते आणि तेव्हापासून सुरू असलेले पूर नियंत्रण आजही सुरूच आहे. धरणातील पाण्याची आवक कमी होत नसल्यामुळे जलविद्युत निर्मिती केंद्राचे तीनही संच १५ ऑगस्टपासून सलग सुरू आहेत. या केंद्रातून २७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत सोडला जात आहे. गुरुवारी (२७ ऑक्टोबर) धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडून ४२२० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. तरीही आवक वाढतच असल्याने आज (३० ऑक्टोबर) दुपारी चार वाजता धरणाचे अजून दोन दरवाजे उघडावे लागले.

सद्यस्थितीत ११ हजार क्युसेक्स विसर्गसध्या धरणाच्या १० पैकी चार दरवाज्यांमधून, तसेच जलविद्युत केंद्राच्या तीन संचांमधून मिळून पूर्णा नदीत एकूण ११ हजार १४० क्युसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. आवक वाढत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत विद्युत निर्मिती केंद्राचे तीनही युनिट पुन्हा सुरू केले आहेत. जलसंपदा विभागाने पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वीज निर्मितीचा दिलासाएकीकडे पूर नियंत्रणाचा ताण असला तरी, धरणात येणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे १५ ऑगस्ट २०२५ पासून दररोज २२.५० मेगावॉट एवढी वीज निर्मिती सुरू आहे. यामुळे स्थानिक स्तरावर काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Relentless Rains Force Yeldari Dam to Release Water into Purna River

Web Summary : Continuous rainfall increased Yeldari Dam's water levels, prompting authorities to release 11,000 cusecs into the Purna River. The dam's gates were opened, and power generation continues since August 15th, providing some relief amid flood control efforts. Villagers are alerted.
टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणRainपाऊस