शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: रस्ता नसल्याने गरोदर मातेची बैलगाडीतून फरफट; 'आई वाचली, पण बाळ दगावले!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:39 IST

स्वातंत्र्यापासून रस्ता नाही, सेलू तालुक्यातील बोथ तांडा येथील प्रकार

सेलू (जि. परभणी) : देशास स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष लोटले तरी अनेक गावांना रस्ता नाही. याला प्रशासनाची अनास्था म्हणावी की, राज्यकर्त्यांचा निष्काळजीपणा. हा प्रश्न सेलू तालुक्यातील बोथ तांडा येथील घटनेमुळे पुन्हा एकदा पुढे आला आहे. रस्ता, पुलाअभावी प्रसूतीवेदनेत गरोदर महिलेला खस्ता खात बैलगाडीतून प्रवास करावा लागला. आरोग्य परिचारिकेच्या धैर्यामुळे त्या महिलेचे प्राण तर वाचले, पण बाळ दगावले. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

बोथ तांडा येथील कल्पना अमोल चव्हाण यांना गुरुवारी पहाटे प्रसूतीवेदना सुरू झाल्या. गावाला जोडणारा दीड किलोमीटर रस्ता नसल्याने ना कोणते वाहन गावात पोहचू शकते, ना रुग्णवाहिका. नाइलाजाने या महिलेस बैलगाडीने वाई गावापर्यंत नेले. तेथून खासगी वाहनाने राव्हा आरोग्य उपकेंद्रात दाखल केले. उपकेंद्रातील आरोग्य परिचारिका सुजाता गायकवाड यांनी तत्काळ उपचार सुरू केले. बाळाभोवतीचे पाणी निघून गेले होते, तर अल्ट्रासाउंडमध्ये बाळाचे हृदय थांबलेले आढळले. तरीही धैर्याने परिचारिका गायकवाड यांनी प्रसूती करून कल्पना चव्हाण यांचे प्राण वाचवले. मात्र, गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. आणखीन काही मिनिटांचा उशीर झाला असता तर आईचेही प्राण धोक्यात आले असते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. नऊ महिने आईच्या उदरात सुरक्षित असलेले बाळ मात्र व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे दगावले. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निवेदन, मागण्यांकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षबोथ आणि बोथ तांडामध्ये सुमारे तेराशे लोकसंख्या असून, ५३० मतदार आहेत. करपरा नदीवर पूल आणि गावाला जोडणारा दीड किमी रस्ता स्वातंत्र्य काळापासूनच झालाच नाही. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे रस्त्यासाठी ग्रामस्थांनी मागील अनेक वर्षांत जि. प., आमदार, खासदारांसह पालकमंत्र्यांनाही अनेकदा निवेदन देऊन मागणी केली, पण याचा उपयोग झाला नाही, असे सचिन राठोड यांनी सांगितले.

रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला होताबोथ व बोथ तांडा गाव चिकलठाणा बु. गट व गणात येते. येथील निडणुकीत ग्रामस्थांनी एकत्र येऊन बहिष्कार टाकल्या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना या घटनेपूर्वीच दिले होते. या घटनेमुळे आता गावात शोककळा पसरली असून, संतापाची लाट उसळली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: No road, pregnant woman's ordeal; baby dies, mother survives.

Web Summary : Due to a lack of roads in Both Tanda, a pregnant woman endured a harrowing bullock cart journey. While the mother survived, the baby tragically died. Villagers express outrage over administrative neglect.
टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाparabhaniपरभणी