- प्रमोद साळवेगंगाखेड ( परभणी) : येथील नगर पालिकेतील काही अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शहरवासीयांच्या अनेक तक्रारी आहेत. यातच मंगळवारी (दि.३०) सकाळी ११ ते ११:३० वाजण्याच्या दरम्यान लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कामाचे बिल काढण्यासंदर्भाने वाद झाल्याची घटना घडली. या वादातून केबिनच्या काचेची, खुर्च्या व पाण्याच्या जारची तोडफोड झाल्याच्या घटनेने पालिका क्षेत्रासह शहरात खळबळ माजली आहे.
मंगळवारी सकाळी ११ ते ११:३० च्या सुमारास मुख्याधिकाऱ्यांची जुनी केबिन असलेल्या व सध्याच्या लेखा विभागाशी संबंधित केबिनमध्ये लेखापाल (अकाउंटंट) शिवम धुत हे शासकीय कामकाज करत बसले होते. यावेळी प्राप्त माहितीनुसार केबिनमध्ये आलेल्या नागरिकाचा अधिकाऱ्यांशी कामाच्या बिलासाठी शाब्दिक वाद झाला. याचे पर्यावसनात संतप्त झालेल्या नागरिकाने संबंधित केबिनच्या काचेची तेथील खुर्च्यां व पाण्याचा जार फोडल्याने कार्यालयात मोठा गोंधळ उडाला.
दरम्यान, पालिका लेखा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादावादी व केबिनच्या तोडफोडी प्रकारानंतरही दुपारी ३:३० वाजेपर्यंत यासंदर्भात पालिकेकडून कुठलीही तक्रार दाखल झालेली नव्हती. या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत असल्याचे सांगत अधिकची प्रतिक्रिया दिली नाही.
Web Summary : Argument over bill payment led to vandalism at Gangkhed Municipality. Chairs and glass were broken in the accounts department. No police complaint was filed till afternoon.
Web Summary : गंगाखेड नगरपालिका में बिल भुगतान को लेकर विवाद हुआ। लेखा विभाग में कुर्सियां और कांच तोड़े गए। दोपहर तक कोई पुलिस शिकायत दर्ज नहीं हुई।