शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

Parabhani: अपघातग्रस्त महिलेचा मृतदेह पाथरी पोलीस ठाण्यात आणत नातेवाईकांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:10 IST

तीन आठवड्यानंतरही वाहनाचा शोध नाही; नातेवाईकांचा संताप

- विठ्ठल भिसे पाथरी (परभणी ): पाथरी तालुक्यातील हदगाव बु येथे १३ मे रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर ३0 मे रोजी उपचारादारम्यान मृत्यू झाला. मात्र, अपघाताला तब्बल तीन आठवडा उलटल्यानंतरही संबंधित वाहनाचा आणि चालकाचा पोलिसांनी तपास लावलेला नाही. यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणत निषेध नोंदविला.

१३ मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास हदगाव बु येथे एका अज्ञात वाहनाने शांताबाई बाबुराव जाधव (55) या महिलेला धडक दिली होती. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली होती. गंभीर जखमी शांतबाई यांना प्रथम परभणी येथील आणि त्यानंतर नांदेडच्या रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, तिथे उपचार सुरू असतानाच ३0  मे रोजी तिचा मृत्यू झाला.

नातेवाईकांचा मृतदेहासह ठाण्यात ठिय्यामात्र, या अपघातानंतर तीन आठवड्याहून अधिक काळ उलटून गेला असतानाही पोलिसांना अद्याप वाहनाचा शोध लागला नाही. यामुळे संतप्त नातेवाईकांनी आज, 31 मी रोजी दुपारी नांदेड येथून महिलेचा मृतदेह थेट पाथरी पोलीस ठाण्यात आणला. वाहन व चालक यांचा शोध लागेपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. सुमारे काही तास पोलिस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत आठ दिवसांच्या आत वाहन व चालकाचा तपास घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हलविण्यात आला.

विना क्रमांकाचा टेम्पो संशयितपोलिसांनी या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगितले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. तपासादरम्यान, एका फुटेजमध्ये कोंबड्या घेऊन जाणारा, नंबर प्लेट नसलेला टेम्पो दिसून आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी दिली आहे. तोच अपघात करणारा वाहन असण्याची शक्यता व्यक्त होत असून, पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातDeathमृत्यू