शहरं
Join us  
Trending Stories
1
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
2
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
3
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
4
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
5
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
6
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
7
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
9
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
10
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
11
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
12
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
13
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
14
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
15
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
16
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
17
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
18
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
19
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
20
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: रेनाखळीत ट्रॅप कॅमेऱ्यात आढळला बिबट्या; शेतकरी, उसतोड मजुरांत दहशत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:16 IST

पाथरी तालुक्यात १३ हजार हेक्टरवर ऊस क्षेत्र; बिबट्यास लपण्यासाठी अनेक जागा, सावधगिरी बाळगण्याचे वन विभागाचे आवाहन

- विठ्ठल भिसेपाथरी (जि. परभणी) : तालुक्यातील रेनाखळी शिवारात बिबट्याचे ठसे आढळून आल्यानंतर आणि दोन गायींचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाकडून लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या आढळून आला आहे. गुरुवारी लावलेल्या कॅमेऱ्याची चिप तपासली असता रविवारी एका शेतात बिबट्या दिसल्याचे समोर आले. दरम्यान, रेनाखळी परिसरात तालुक्यातील सर्वाधिक ४२० हेक्टर ऊस क्षेत्र एकट्या रेनाखळी शिवारात आहे. दाट उसात लपण्यासाठी सहज जागा उपलब्ध होत असल्याने या भागात बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी आणि ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाथरी तालुक्यातील रेनाखळी शिवारात मागच्या आठवड्यात २७ आणि ३० नोव्हेंबरला बिबट्याच्या हल्ल्यात रेनाखळी येथील संदीपान अंबादास श्रावणे आणि प्रमोद भास्करराव हरकळ यांच्या शेतातील आखाड्यावर बिबट्याच्या हल्ल्यात दोन जनावरांचा फडशा पडला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वनरक्षक अंकुश जाधव आणि पथकाने वन घटनास्थळी पंचनामा केला होता. त्यावेळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. गुरुवारी वन विभागाने तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविलेले होते. शनिवारी वन विभागाने ट्रॅप कॅमेऱ्यामधील चिप तपासणीसाठी काढली. रविवारी यातील प्रमोद हरकळ यांच्या शेतातील ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या आढळून आल्याची माहिती वन रक्षक अंकुश जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली. हा बिबट्या रेनखळीसोबतच वरखेड आणि लगतच्या सेलू भागातील काही गावांत आढळून आला आहे.

पाथरी तालुक्यातील रेनाखळी वरखेड परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे ठसे आढळणे, दोन जनावरे फस्त करणे आणि ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचे स्पष्ट चित्र दिसणे या घटनांमुळे शेतकरी व मजूर वर्गात भीती वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या दर्शनामुळे वन विभाग सतर्क मोडवर आला असून नागरिकांना अलर्ट राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या पाथरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असून सुमारे 13 हजार हेक्टरवर ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे. या भागातील फडात बिबट्याचा मुक्त वावर असल्याने ऊस तोडणीचे काम धीम्या गतीने सुरू आहे. स्थानिक दोन्ही साखर कारखान्यांसोबत बाहेरील जिल्ह्यांतील कारखान्यांचेही तोडणी पथक येथे दाखल झाले आहे, मात्र मजूर गटाने रात्रीचे काम टाळणे असा निर्णय घेत असल्याचे समजते. या परिस्थितीत वन विभागाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, शेतकऱ्यांनी रात्री एकटे शेतात न जाणे, पाळीव जनावरे सुरक्षित ठेवणे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

वन विभागाचे आवाहन• बिबट्या परिसरात असल्याने सावध राहा• रात्री एकटे शेतात जाऊ नका• जनावरे मोकाट सोडू नका / सुरक्षित बांधावीत• संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवा

बिबट्या आला तर काय करावे / काय करू नये करावे :• बिबट्या दिसला तर घाबरू नका शांत राहा, पळून जाऊ नका• जोरात आवाज करा / टोचणारे साधन वापरा• गटाने राहा, टॉर्च चा वापर करा हातात घुंगराची काठी ठेवा , गळ्या भोवती रुमाल बांधा ,मोबाईल मध्ये गाणे वाजवीत जा त्याच बरोबर पशुधन जालीबंध गोठ्यात ठेवा ,शेतात व घराबाहेर झोपू नका • गावाजवळ शेतात किंवा ऊस तोडणी दरम्यान मादी बिबट्या व पिल्ले आढळल्यास त्यास हाताळू नये

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Spotted in Parbhani Trap Camera, Fear Grips Villagers

Web Summary : A leopard was captured on a trap camera in Renakhali, Parbhani, after livestock attacks. This has created fear among farmers and sugarcane workers. Authorities urge caution, advising against solitary night visits to fields and securing livestock, as the leopard's presence impacts sugarcane harvesting.
टॅग्स :leopardबिबट्याparabhaniपरभणीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र