शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: बीडीओ सामूहिक रजेवर; कामकाज ठप्प, मनरेगासह विविध योजना अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:11 IST

गटविकास अधिकारी सामूहिक रजेवर गेल्याने जिल्ह्यातील मनरेगा कामांना मोठा फटका बसला आहे

- मारोती जुंबडेपरभणी : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गटविकास अधिकारी सुनीता मसरकोल्हे यांच्या मनरेगा प्रकरणातील अटकेच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी (बीडीओ) तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ४ डिसेंबरपासून सामूहिक रजेवर गेले असून जिल्हा प्रशासनाच्या कामकाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

या प्रकरणात अधिकाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याऐवजी प्रथम विभागीय चौकशी व्हावी, दोष सिद्ध होईपर्यंत अटक किंवा गुन्हा दाखल करू नये, तसेच मनरेगा आणि इतर योजनांमधील तांत्रिक त्रुटींवर अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची चुकीची पद्धत बंद करावी, अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने दोन दिवसांच्या सामूहिक रजेची घोषणा केली आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.

या आंदोलनात परभणी जिल्ह्याच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोंसीकर, अंकुश चव्हाण, जयंत गाडे, तसेच जिल्ह्यातील गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, दत्तात्रय निलपत्रेवार,आर. एम. चकोर, सुभाष मानकर, एन. बी. मिसाळ, जयराम मोडके, बी. आर. गोरे, अक्षय सुक्रे इत्यादी अधिकाऱ्यांचा सहभाग आहे.

मनरेगा कामांना बसतोय फटकागटविकास अधिकारी सामूहिक रजेवर गेल्याने जिल्ह्यातील मनरेगा कामांना मोठा फटका बसला असून विविध शासकीय योजनांची मंजुरी, प्रक्रिया, मस्टर रोल, कामांचे मोजमाप आणि निधी वितरणाची कामे तात्पुरती ठप्प झाली आहेत. ग्रामीण भागातील अनेक सुरू असलेली कामे अडथळ्यात येत असल्याने ग्रामपंचायती आणि लाभार्थींमध्ये संभ्रम वाढला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parabhani BDOs on Mass Leave; Work Paralysed, Schemes Affected

Web Summary : Parabhani's BDOs are on mass leave protesting an officer's arrest. Work is paralyzed affecting MNREGA schemes. Rural projects face delays and confusion.
टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी