चार हजार लाभार्थ्यांतील २०० जणांनाच जाणवली किरकोळ लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST2021-02-10T04:17:39+5:302021-02-10T04:17:39+5:30

मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक चांगलेच धास्तावले होते. त्यावेळी या आजारावरील लसीची प्रतीक्षा केली जात होती. आता प्रतिबंधक लस ...

Out of 4,000 beneficiaries, only 200 experienced minor symptoms | चार हजार लाभार्थ्यांतील २०० जणांनाच जाणवली किरकोळ लक्षणे

चार हजार लाभार्थ्यांतील २०० जणांनाच जाणवली किरकोळ लक्षणे

मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक चांगलेच धास्तावले होते. त्यावेळी या आजारावरील लसीची प्रतीक्षा केली जात होती. आता प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असताना काही जणांच्या मनात मात्र या लसीविषयी भिती निर्माण झाली आहे. लस घेतल्यानंतर ताप येणे, अंग जड पणे अशी लक्षणे जाणवतात, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तरीही परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाची टक्केवारी अद्याप वाढलेली नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ३९१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे. त्यापैकी केवळ २१४ कर्मचाऱ्यांना किरकोळ स्वरुपाचा ताप आणि अंग जड पडण्यासारखे लक्षणे जाणवली. ते देखील सुरुवातीच्या काळातच हे प्रमाण अधिक होते. विशेष म्हणजे एकाही कर्मचाऱ्यास गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे कोरोनाची लस सुरक्षित असून, प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

किरकोळ लक्षणे जाणवलेले कर्मचारी

जिल्हा रुग्णालय : २६

उपजिल्हा रुग्णालय सेलू:१२६

जांब पीएचसी : ८

पूर्णा आरएच : ३

गंगाखेड एसडीएच : १

पालम आरएच : ३१

सोनपेठ आरएच : ४

पाथरी आरएच : ३

मानवत आरएच : १

Web Title: Out of 4,000 beneficiaries, only 200 experienced minor symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.