इतर आजार घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST2021-04-14T04:16:10+5:302021-04-14T04:16:10+5:30
पुलाचे काम संथगतीने परभणी : येथील रेल्वे स्थानकाजवळील विद्यापीठ गेट उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. या कामामुळे मागच्या दोन ...

इतर आजार घटले
पुलाचे काम संथगतीने
परभणी : येथील रेल्वे स्थानकाजवळील विद्यापीठ गेट उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. या कामामुळे मागच्या दोन महिन्यांपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
हातगाड्यांचा अडथळा
परभणी : येथील गव्हाणे रोड भागात फळ विक्री करणाऱ्या हातगाड्यांची संख्या वाढली आहे. या हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. पोलिसांनी या मार्गावरील हातगाडे इतरत्र हटवावेत, अशी मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
परभणी : सुपर मार्केट ते देशमुख गल्ली या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मनपा प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
मजुरांचे हाल
परभणी : जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेची कामे कोरोनामुळे ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागात मजुरांची संख्या वाढली असून, त्यांना काम देण्याची मागणी होत आहे.