पाथरीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:13 IST2021-01-09T04:13:58+5:302021-01-09T04:13:58+5:30

टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने १० जानेवारी रोजी देशातील २५ पेक्षा जास्त राज्य व केंद्रशासित प्रदेशातील १०० पेक्षा ...

Organizing cricket tournament in Pathari | पाथरीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पाथरीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने १० जानेवारी रोजी देशातील २५ पेक्षा जास्त राज्य व केंद्रशासित प्रदेशातील १०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये टेनिस क्रिकेट खेळाचा महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जुनेद खान दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली १० जानेवारी रोजी पाथरी प्रिमियर लिग मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ४६ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेत एकूण ४ संघांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे आशिया बुक ऑफ रेकाॅर्ड, इंडिया रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शेख मुजीब, शेख धावारे, वहाब खान पठाण, संदीप सुत्रावे, सय्यद मुस्तफा, एकबाल अन्सारी, अब्दुल्ला अन्सारी, सय्यद साबील, फहीम कादरी, नुरुद्दीन शेख, राधाकृष्ण गवारे, अरविंद जाधव आदी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Organizing cricket tournament in Pathari