तलाठ्यांना मुख्यालयी नियमित उपस्थित राहण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:17 IST2021-03-06T04:17:14+5:302021-03-06T04:17:14+5:30

सातबारा व फेरबारनोंदीसाठी शासनाकडून देण्यात आलेले डिजिटल सिग्निचन सर्टीफिकेट हे सॉफ्टवेअर संथगतीने सुरू असल्याने, मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांना सातबारा ...

Order for Talathas to be present at the headquarters regularly | तलाठ्यांना मुख्यालयी नियमित उपस्थित राहण्याचे आदेश

तलाठ्यांना मुख्यालयी नियमित उपस्थित राहण्याचे आदेश

सातबारा व फेरबारनोंदीसाठी शासनाकडून देण्यात आलेले डिजिटल सिग्निचन सर्टीफिकेट हे सॉफ्टवेअर संथगतीने सुरू असल्याने, मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांना सातबारा मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने शेतकरी शहरात तहसील कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. या अनुषंगाने ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश काढले आहेत. त्यात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने, या अनुषंगाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी तलाठी यांच्याकडे सातबारा उतारा मिळविण्यासाठी येत असतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांना गावातच सातबारा उपलब्ध व्हावा, याकरिता तलाठ्यांनी त्यांचा सज्जा असलेल्या मुख्यालयी नियमित उपस्थित राहावे, तसेच सज्जातील गावांना भेटी देऊन गावातच शेतकऱ्यांना सातबारा उपलब्ध करून द्यावा, या आदेशाची अंमलबजावणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी करावी, आदेशाचे पालन न करणाऱ्या तलाठ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Order for Talathas to be present at the headquarters regularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.