कोरोना रुग्णालयात केवळ ३८८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:59+5:302021-06-03T04:13:59+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णालयांमधील रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सध्या २ हजार ५९९ ...

Only 388 patients at Corona Hospital | कोरोना रुग्णालयात केवळ ३८८ रुग्ण

कोरोना रुग्णालयात केवळ ३८८ रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णालयांमधील रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सध्या २ हजार ५९९ रुग्ण उपचाराधीन असून, त्यापैकी केवळ ३८८ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित २ हजार २११ रुग्ण घरी राहून उपचार घेत आहेत. कोविड रुग्णालयांमध्ये १ हजार ५७१ खाटांची सुविधा असून, या रुग्णालयांमध्ये २६९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. १ हजार ३९२ खाटा रिक्त आहेत, तर कोरोना केअर सेंटरमध्ये २ हजार ३७३ खाटांची सुविधा असून, ११९ रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी २ हजार २५४ खाटा रिक्त आहेत. कोरोना रुग्णालयातील रुग्णसंख्या लक्षणीय घटली आहे.

१७१ रुग्णांना ऑक्सिजन

कोरोना रुग्णालयात दाखल असलेल्या ३८८ रुग्णांपैकी १७१ रुग्णांना ऑक्सिजन दिले जात आहे, तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अतिदक्षता विभागात ७३ आणि अतिदक्षता विभाग वगळता, इतर ठिकाणी ९८ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. सध्या ऑक्सिजनच्या ८९५ खाटा रिक्त आहेत.

Web Title: Only 388 patients at Corona Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.