पुस्तकांशिवाय भरली ऑनलाइन शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST2021-07-15T04:14:05+5:302021-07-15T04:14:05+5:30
परभणी जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत २ लाख ९२ हजार ५७९ विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये पहिली ते चौथीपर्यंत १ लाख ...

पुस्तकांशिवाय भरली ऑनलाइन शाळा
परभणी जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत २ लाख ९२ हजार ५७९ विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये पहिली ते चौथीपर्यंत १ लाख ४७ हजार ८०४, तर पाचवी ते आठवीपर्यंत १ लाख ४४ हजार ७७५ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीद्वारे दरवर्षी मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. यावर्षी नवीन पुस्तकांची छपाई कोरोना संसर्गामुळे थांबली होती. त्यामुळे पुढच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची पुस्तके शाळांमध्ये जमा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, याकडे बहुतांश पालकांसह विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. केवळ २० ते ३० टक्के विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत करण्यात आली. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांची छपाईदेखील उशिराने झाली. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांची उत्सुकता असते, पण शाळा सुरू होऊन महिना उलटला, अद्याप नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शाळेत पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना हजेरी लावावी लागत आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकाशिवाय ऑनलाइन शिक्षण द्यावे लागत असल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.