म्युकरमायकोसिससंदर्भात ऑनलाईन मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:14+5:302021-05-27T04:19:14+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि आरोग्य सभापती अंजलीताई आनेराव यांच्या संकल्पनेतून २५ मे रोजी जिल्ह्यातील सर्व ...

म्युकरमायकोसिससंदर्भात ऑनलाईन मार्गदर्शन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि आरोग्य सभापती अंजलीताई आनेराव यांच्या संकल्पनेतून २५ मे रोजी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्रातील समुदाय अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात माहिती देण्यात आली. फिजिशियन डॉ. रामेश्वर नाईक, कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. तेजस तांबोळी, बालरोगतज्ज्ञ डॉ. मोईज यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. म्युकरमायकोसिसची लक्षणे, हा आजार कशामुळे होतो, आजार होण्यासाठी इतर अनुषांगिक बाबी, उपचाराची पद्धत आदींविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे कोरोनाची लक्षणे, उपचार, औषधे, घ्यावयाची काळजी, आजाराची लक्षणे दिसून आल्यास कशा पद्धतीने उपचार करावेत, याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश शिरसुलकर आदींची उपस्थिती होती.