एक लाख निराधारांना आधार प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:19+5:302021-04-16T04:16:19+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात ...

एक लाख निराधारांना आधार प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात निराधार मंडळींची उपासमार होऊ नये, त्यांना आर्थिक अडचण जाणवू नये, या उद्देशाने प्रत्येक निराधाराच्या खात्यावर १ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील १ लाख ५ हजार निराधार नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. राज्य शासनाच्या श्रावण बाळ आणि वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी आहेत. ५२ हजार १७९ लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजनेचा, तर ३५ हजार ८१ लाभार्थ्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे १८ हजार २ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा वेतन मिळते. या सर्व लाभार्थ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदतीचा आधार दिला आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच १ हजार रुपयांची मदत जमा होणार आहे. संचारबंदी आणि निर्बंधांमुळे लाभार्थ्यांची उपासमार होऊ नये, या उद्देशाने ही मदत जाहीर करण्यात आली आहे.