रेल्वेच्या धडकेने एकजण ठार

By Admin | Updated: August 31, 2015 13:46 IST2015-08-31T13:40:55+5:302015-08-31T13:46:39+5:30

तालुक्यातील पिंपळाचौरे येथील एकजण रेल्वेच्या धडकेने ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली.

One killed by a train | रेल्वेच्या धडकेने एकजण ठार

रेल्वेच्या धडकेने एकजण ठार

वसमत : तालुक्यातील पिंपळाचौरे येथील एकजण रेल्वेच्या धडकेने ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. 
पिंपळाचौरे शिवारातील रेल्वे पटरीवर संजय लक्ष्मण कोल्हे (वय ४५ रा. पिंपळा चौरे) हे रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. याप्रकरणी त्यांचा लहान भाऊ राजू लक्ष्मण कोल्हे यांनी पोलिसांना खबर दिली. त्यावरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मिसाळ, राठोड हे पुढील तपास करत आहेत. (वार्ताहर)
 

Web Title: One killed by a train