एकदिवसीय कृषी महोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:35+5:302021-02-05T06:03:35+5:30

तालुक्यातील खादगाव भाबट येथे २४ जानेवारी रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर व मारोती नगर आणि ...

One-day agricultural festival celebration | एकदिवसीय कृषी महोत्सव साजरा

एकदिवसीय कृषी महोत्सव साजरा

तालुक्यातील खादगाव भाबट येथे २४ जानेवारी रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर व मारोती नगर आणि खादगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय जागतिक कृषी महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी थेट बांधावर हा महोत्सव आपली संस्कृती, साहित्य, प्रदर्शन, एक दिवसीय जनजागरण खादगाव येथील जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाला. पहिल्या सत्रास वृक्ष दिंडीने प्रारभ झाला. यात हलगी पथकासह लेझीम, फुगडी, स्वच्छता संदेश, कृषीविषयक घोषवाक्य देत वृक्षदिंडी गावातून काढण्यात आली. या फेरीत सेवेकरी, गावकरी आणि शेतकरी मोठ्या संख्येत होते. तर दुसऱ्या सत्रात शेतकरी विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील गायकवाड तर मुख्य मार्गदर्शक कृषी सहायक सुहास धोपटे व प्रवीण रोडगे, गणेश नाटकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते परिसरातील २१ प्रगतशील शेतकरी यांचा गौरव करण्यात आला.

तिसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख सचिन गोरे, त्र्यंबक बोराडे, दत्ताराव पावडे, श्रावण भवर, डाॅ. जगन्नाथ ईक्कर आदी उपस्थित होते.

Web Title: One-day agricultural festival celebration