परभणीत शेतकºयांचे एक कोटी ८१ लाख रुपये थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:36 IST2018-03-10T00:36:48+5:302018-03-10T00:36:54+5:30
मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत.

परभणीत शेतकºयांचे एक कोटी ८१ लाख रुपये थकले
सत्यशील धबडगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत: मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत.
मानवत व पाथरी तालुक्यासाठी ९ फेब्रुवारीपासून मानवत येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये विदर्भ फेडरेशनच्या वतीने तूर खरेदीस सुरुवात करण्यात आली़ पाथरी व मानवत तालुक्यातील १ हजार ७०५ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ नोंदणी झालेल्या शेतकºयांना केंद्र चालक व खरेदी- विक्री संघाच्या वतीने संदेशही पाठवून खरेदी केंद्रावर तूर आणण्याचे आवाहन केले जात आहे़ विदर्भ फेडरेशनने ६ मार्चपर्यंत १९९ शेतकºयांची २ हजार ५३५ क्विंटल तूर खरेदी केली आहे. तर १ हजार ५०४ शेतकºयांची तूर खरेदी करणे शिल्लक आहे. परंतु, खरेदी केंद्रावर तूर विक्री करुनही एकाही शेतकºयाला रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे १९९ शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख १५ हजार ७५० रुपये थकले आहेत. ८ दिवसांमध्ये शेतकºयांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे रक्कम जमा करण्याचे आदेश शासनाने दिलेले असतानाही महिना उलटला तरीही एकाही शेतकºयाच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही़ त्यामुळे शेतकºयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या लग्नसराई सुरु आहे. अनेक शेतकºयांनी तुरीच्या भरोस्यावर लग्न कार्य ठरविले आहे. परंतु, रक्कमच हाती आली नसल्याने शतकरी हतबल झाले असून तुरीच्या रक्कमेसाठी चकरा मारत आहेत.
शेतकºयांचा ओढा हमी भाव केंद्राकडे
४सध्या बाजारपेठेमध्ये ४ हजार ३०० पासून ४ हजार ५०० रुपये पर्यंत प्रति क्विंटल दर आहेत. तर हमीभाव केंद्रावर ५ हजार ४५० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी तूर खरेदी केंद्र जवळ करीत आहेत. तालुक्यातील शेतकरी तूर विक्रीसाठी अजूनही नोंदणी करीत आहेत. त्यामुळे शेतकºयांची संख्याही वाढत आहे.
सॉफ्टवेअरमध्ये अडचण असल्यामुळे तूर खरेदी केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास विलंब होत आहे.
-भागवत सोळंके, जिल्हा विपणन अधिकारी, विदर्भ मार्केटींग फेडरेशन