मजुरीचे पैसे मागितल्याने एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:22 IST2021-09-05T04:22:24+5:302021-09-05T04:22:24+5:30

येथील भोगाव देवी येथील बालाजी गोविंदराव खांडगे यांनी गावातील खंडू जब्बारभाई पठाण यांच्या शेतात दोन दिवस मजुरीचे काम केले ...

One beaten for demanding wages | मजुरीचे पैसे मागितल्याने एकास मारहाण

मजुरीचे पैसे मागितल्याने एकास मारहाण

येथील भोगाव देवी येथील बालाजी गोविंदराव खांडगे यांनी गावातील खंडू जब्बारभाई पठाण यांच्या शेतात दोन दिवस मजुरीचे काम केले होते. यासाठी दररोज ३०० रुपये मजुरी देण्याचे ठरले होते. त्यानुसान खांडगे हे पठाण यांना २ सप्टेंबर रोजी मजुरीचे पैसे मागण्यासाठी गेले असता दुपारी पैसे देतो, असे त्याने सांगितले. त्यानंतर दुपारी पठाण हा खांडगे यांच्या घरी दुपारी २ च्या सुमारास दारू पिऊन आला. त्यानंतर त्याने कशाचे पैसे म्हणून खांडगे यांच्याशी वाद घातला तसेच शिवीगाळ करून लाभा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी बाजूला पडलेली वीट उचलून खांडगे यांच्या डोक्यात मारली. यात ते जखमी झाले. याबाबत बालाजी खांडगे यांनी २ सप्टेंबर रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून खंडू जब्बारभाई पठाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One beaten for demanding wages