कालव्याच्या दुरुस्तीसाठी साडेसहाशे कोटींचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST2021-06-10T04:13:32+5:302021-06-10T04:13:32+5:30
जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा खराब झाला असल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाली आहे. परिणामी परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे मागील ...

कालव्याच्या दुरुस्तीसाठी साडेसहाशे कोटींचा आराखडा
जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा खराब झाला असल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाली आहे. परिणामी परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे मागील अनेक वर्षांपासून कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. या कालव्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने ८ जून रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यावर जयंत पाटील यांनी आ. डॉ. पाटील यांना वरीलप्रमाणे आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात दिनेश बोबडे, रवींद्र पतंगे, बाजार समितीचे संचालक तानाजी भोसले, प्रभाकर जयस्वाल, अनिल डहाळे, बाळासाहेब रसाळ, वसीक इनामदार आदींची उपस्थिती होती.
जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामुळे जिल्ह्यातील ९७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. कालवा नादुरुस्त असल्याने वहन क्षमता कमी झाली आहे. या कालव्याची वहन क्षमता २१०० क्युसेस असताना केवळ ९०० ते ११०० क्षमतेने पाणी वाहते. त्यामुळे परभणी तालुक्यातील ५० टक्के गावे कालव्याच्या सिंचनापासून वंचित राहतात. या शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. परिणामी नुकसान होते. ही बाब आ. डॉ. राहुल पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली, तसेच कालव्याच्या दुरुस्तीसाठी विशेष बैठक घेण्याची मागणीही आ. डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी केली.