आघाडी झाली तर ठीक; अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर लढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:23 IST2021-08-24T04:23:00+5:302021-08-24T04:23:00+5:30
परभणी जिल्ह्यात होऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे जिल्हा निरीक्षक ...

आघाडी झाली तर ठीक; अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर लढेल
परभणी जिल्ह्यात होऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे जिल्हा निरीक्षक बसवराज पाटील-नागराळकर यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक तालुकानिहाय कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नागराळकर म्हणाले की, परभणी जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर राज्यात महाविकास आघाडी झाली तर आम्ही आघाडीसोबत आहोत, अन्यथा या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल, असा इशारा देत ते म्हणाले की, पक्षाला मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात असल्याने या निववडणुकीत पक्ष एकहाती सत्ता मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय सचिव सोनाली देशमुख, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश जाधव, आ. बाबाजानी दुर्राणी, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, शहर जिल्हाध्यक्ष नंदा राठोड, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रोडगे, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय रोडगे, युवती जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे, सभापती दादासाहेब टेंगसे, सभापती सुभाषराव कोल्हे, सोनपेठ तालुकाध्यक्ष दशरथराव सूर्यवंशी, युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे, सुमंत वाघ, दीपक वारकरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता मायंदळे, शहर जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे आदींसह परभणी शहर, तालुका, पूर्णा, गंगाखेड,पालम, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ येथील पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी, राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, नगरपालिका अध्यक्ष व सदस्य, महानगरपालिका सदस्य व सर्व सेलच्या पदाधिकारी आदींची उपस्थित होती.