घरकुलांना अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:34+5:302021-03-27T04:17:34+5:30
नांदेखडा रस्त्याची दुरवस्था परभणी : पारदेश्वर मंदिर ते नांदखेडा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्यावर मधोमध भेग ...

घरकुलांना अडथळे
नांदेखडा रस्त्याची दुरवस्था
परभणी : पारदेश्वर मंदिर ते नांदखेडा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्यावर मधोमध भेग पडली असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
कालव्यात साचला गाळ
परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. कालव्याला पाणी सोडल्यानंतरही टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अवैध धंदे जोरात
परभणी : जिल्ह्यात ग्रामीण भागात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. मटका, जुगार यासह अवैधरीत्या दारूची विक्री होत आहे. पोलीस प्रशासनाने कारवाई केल्यानंतर, या अवैध धंद्यांवर फारसा परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पीकविमा मिळेना
परभणी : ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा वाटप केला नाही. तक्रारी करूनही प्रशासन मात्र गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे.