शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

जिल्ह्यातील नर्सरी, केजीच्या २४ हजार बालकांचे पुढील वर्षही घरातच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST

परभणी : कोरोनामुळे जिल्ह्यातील नर्सरी, केजीमध्ये जाणाऱ्या जवळपास २४ हजार बालकांचे पुढील वर्षही घरातच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ...

परभणी : कोरोनामुळे जिल्ह्यातील नर्सरी, केजीमध्ये जाणाऱ्या जवळपास २४ हजार बालकांचे पुढील वर्षही घरातच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुलांना अक्षरओळख ते अक्षरअट्टाहास याची माहिती मिळणार कशी? असा सवाल उपस्थित होत आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. मधल्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत बनले आहे. याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. गेल्या वर्षभरापासून नर्सरी, केजीसह सर्व वर्गांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मधल्या काळात ६ वीच्या वर्गाच्या पुढील वर्गांच्या शाळा सुरू झाल्या होत्या; परंतु नर्सरी, केजी आणि पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले नाहीत.

लहान मुलांना अक्षरओळख, शब्दओळख, अक्षरे गिरवणे, अंकपरिचय ते अंकअट्टाहास, हात आणि मेंदू यांचा वापर, चित्र काढणे, रंग ओ़ळखणे. चित्रात रंग भरणे, दिशांची माहिती कळावी, यासाठी त्यांना नर्सरीमध्ये पाठविण्यात येते. जिल्ह्यात अशा जवळपास १७५ शाळांमध्ये २४ हजार बालके शिक्षणाचे घडे गिरवतात. पण गेल्या वर्षभरापासून त्यांचे शिक्षण बंद आहे. शिवाय यावर्षीही कोरोनाचा संसर्ग कमी झाला नसल्याने त्यांचे हे वर्षही घरातच जाण्याची शक्यता आहे.

मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम; ही घ्या काळजी

पालकांनी मुलांना वेळेचे नियोजन करून द्यावे. मुलांच्या आवडीनुसार त्यांच्यासोबत खेळण्यासाठी वेळ द्यावा. मुलांची एनर्जी वापरली गेली नाही, तर ती भावनेच्या माध्यमातून बाहेर पडतात व मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. त्यामुळे त्यांची काळजी घेतली पाहिजे.

- डॉ. सुभाष काळे, मानसोपचार तज्ज्ञ

संस्थाचालक म्हणतात...

पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये शालेय शिक्षणाबरोबरच नीतिमूल्य, संस्कार व सर्वांगीण विकासाचे धडे मुलांना दिले जातात. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होत आहे.

- प्रवीण धाडवे, संस्थाचालक

पूर्व प्राथमिक शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण व अविभाज्य घटक असते. विद्यार्थ्याच्या मेंदूचा जवळपास ९० टक्के बौद्धिक विकास वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत होत असतो. त्यामुळे हे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.

- रामेश्वर राऊत, संस्थाचालक

अक्षरओळख आणि अंकओळख, डोळ्यांना आणि कानांना समजण्यासाठी, तसेच ते लिहायला शिकवण्याचा उद्देश, हातात पेन्सिल पकडण्याची ग्रीप यावी, या दृष्टिकोनातून लहान मुलांसाठी नर्सरी, केजीचे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. पण कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून या शिक्षणापासून मुलांना दूर राहावे लागत आहे. याबद्दल वाईट वाटत आहे.

- दत्ता पवार, संस्थाचालक

पालकही परेशान

मुलाला नर्सरीमध्ये टाकायचे होते; कोरोनामुळे गेल्यावर्षी ते शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी तरी प्रवेश घ्यावा म्हटलं, तर कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नाइलाजाने मुलाला घरीच याबाबत थोडंफार शिकवत आहे.

- संजय काळे, पालक

मुलीला केजीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे; परंतु कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. त्यामुळे बाहेर कोठेही पाठवण्याची हिंमत होत नाही. मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढच्यावर्षी केजीत प्रवेश घेऊ.

- निर्मलाताई पाटील, पालक

मुलांना अक्षरांची ओळख व्हावी, निसर्गाची माहिती व्हावी, यासाठी त्यांना नर्सरी, केजीमध्ये प्रवेश दिलाच पाहिजे; परंतु सध्याचे वातावरण चांगले नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेस प्राधान्य असावे.

- अशोक ढाले, पालक