रुग्णसंख्या घटलेलीच; मृत्यू मात्र वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:55+5:302021-06-04T04:14:55+5:30
परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग गुरुवारीदेखील घटलेला राहिला; परंतु बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. तीन ...

रुग्णसंख्या घटलेलीच; मृत्यू मात्र वाढले
परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग गुरुवारीदेखील घटलेला राहिला; परंतु बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे.
तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. ही घट गुरुवारीदेखील कायम राहिली. आरोग्य विभागाला १ हजार ९४५ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ७८३ अहवालांमध्ये ३५ आणि रॅपिड टेस्टच्या १६२ अहवालांमध्ये १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला असला तरी कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यू अद्यापही थांबले नाहीत. उलट बुधवारपेक्षा गुरुवारी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा जिल्हा रुग्णालय आणि आयटीआय हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एक तर जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या चार रुग्णांमध्ये २ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.
एकूण ५०हजार ७० रुग्णसंख्या झाली असून, त्यापैकी ४६ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २३९ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २ हजार १०५ रुग्ण उपचार घेत आहेत.
५४० रुग्णांना सुट्टी
जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसभरात ५४० रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे सुट्टी देण्यात आली. मागील चार दिवसात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या ठरली आहे.