रेमडेसिविरच्या तक्रारीसाठी आता वॉररूमची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST2021-04-22T04:17:49+5:302021-04-22T04:17:49+5:30
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार जिल्ह्यात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिविर इंजेक्शन ...

रेमडेसिविरच्या तक्रारीसाठी आता वॉररूमची स्थापना
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार जिल्ह्यात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा व वितरण याबाबत जनतेला माहिती मिळावी, यासाठी तसेच या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तासांसाठी वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. यासाठी ०२४५२-२२६४००/१०७७ क्रमांक देण्यात आला आहे. यासाठी संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे त्यांच्या भ्रमणध्वनीवरदेखील तक्रार करता येणार आहे. तसेच कोविड प्रादुर्भाव संदर्भातील माहितीसाठी परभणी मनपास्तरावर देखील वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. येथे नागरिकांना ९०४९३५१९९९ व ९०४९३६१९९९ या मोबाइल क्रमांकावर आणि जिल्हा परिषद इमारत येथील वॉररूम येथे ०२४५२-२२३९०० या क्रमांकावर नागरिकांना संपर्क साधता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.