सहाशे थकबाकीदारांना नोटीस

By Admin | Updated: February 13, 2015 15:26 IST2015-02-13T15:26:53+5:302015-02-13T15:26:53+5:30

महानगरपालिकेच्या कर विभागांतर्गत शहरातील सहाशे मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्याबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. यामध्ये मनपाने मागील दोन दिवसांत जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Notice to six hundred defaulters | सहाशे थकबाकीदारांना नोटीस

सहाशे थकबाकीदारांना नोटीस

परभणी : महानगरपालिकेच्या कर विभागांतर्गत शहरातील सहाशे मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्याबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. यामध्ये मनपाने मागील दोन दिवसांत जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईस प्रतिसाद देत २३ जणांनी कराची रक्कम भरल्याची माहिती कर निरीक्षक श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली.
शहरातील व्यापारी संकुल, हॉटेल, महाविद्यालय, शाळा, चित्रपटगृह, मंगल कार्यालय, यासह घरगुती दुकाने, घरपट्टी, नळपट्टी थकित असणार्‍या सहाशे जणांना मागील ८ दिवसांत नोटीस देण्यात आल्या आहेत. उपायुक्त दीपक पुजारी, रणजीत पाटील यांनी कर अधीक्षकांना सूचना देऊन ११फेब्रुवारीपासून मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार कर विभागाने ८ कर निरीक्षक, ४ वसुली अधिकारी यांचे वेगवेगळे पथक निर्माण करुन मोहिमेस सुरुवात केली आहे. दोन दिवसांत १0 लाख रुपयांची वसुली पथकाने केली आहे. यामध्ये शिवाजी चौक, नवा मोंढा, विष्णूनगर, रामकृष्णनगर व वसमतरोडवरील काही भागात मोहीम राबविण्यात आली. दोन दिवसांत राबविलेल्या मोहिमेत २३जणांनी मनपाच्या कराची रक्कम भरली आहे. ही मोहीम ३0मार्चपर्यंत रोज वेगवेगळ्या भागात राबविण्यात येणार आहे. /(प्रतिनिधी)

वारंवार सूचना, मागणी बिल, नोटीस देऊनही ज्या मालमत्ताधारकांनी थकबाकी भरलेली नाही, या मालमत्ता जप्त करण्याची मोहीम मनपाने आता हाती घेतली आहे. शहरातील मालमत्ताधारकांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी कर भरावा, असे आवाहन मनपाच्या दोन्ही उपायुक्तांनी नागरिकांना केले आहे.
चित्रपटगृह, मंगल कार्यालयांना नोटीस
> शहरातील सर्वच चित्रपटगृह, मंगल कार्यालय यांच्याकडे थकबाकी आहे. अशा सर्वांना मनपाने नोटीस दिल्या आहेत. यामध्ये वाढीव कराची आकारणी करुन नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे २१दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर सर्वच ठिकाणी थेट कारवई होत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

 

Web Title: Notice to six hundred defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.