परभणी तालुक्याला पाण्याचे नो टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:28+5:302021-05-01T04:16:28+5:30
मागील काही वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने धरण, तलाव, नदी, नाले, ओढे या जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाण्याची साठवण होत ...

परभणी तालुक्याला पाण्याचे नो टेन्शन
मागील काही वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने धरण, तलाव, नदी, नाले, ओढे या जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाण्याची साठवण होत नव्हती. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासूनच तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा जाणू लागत होत्या. त्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार तयार करण्यात येत होता. परंतु, पाणीटंचाई मात्र दूर होत नव्हती. २०२०-२०२१ मध्ये तालुक्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यावर्षी तर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील जलस्रोतांचा मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे तालुक्यातील १३१ गावांपैकी केवळ ५ गावात सद्यस्थितीत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यासाठी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने १० लाख रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर परभणी तालुक्यातील मोहपुरी, आळंद, तांबसवाडी, सिरसी बु व ठोळा या गावात विहीर, बोअर अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
जायकवाडी,येलदरी व निम्न दुधनाचा आधार
यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जायकवाडी,येलदरी धारण, निम्न दुधना प्रकल्प तुडुंब भरले. सध्या या धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा परभणी तालुक्यातील शेत सिंचनासह पाणीटंचाई दूर होण्यासही मदत होत आहे .त्यामुळे हे तिन्ही धरण तालुक्यासाठी आधार मिळत असल्याचे दिसून येत आहे.