रेल्वे फुल्ल, मुंबईसाठी आरक्षण मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST2021-09-11T04:19:31+5:302021-09-11T04:19:31+5:30
सध्या सुरू असलेल्या रेल्वे नांदेड-पनवेल आदिलाबाद-मुंबई (नंदीग्राम) सिकंदराबाद-मुंबई (देवगिरी) नांदेड-पुणे (साप्ताहिक) नांदेड-अमृतसर (सचखंड) नांदेड-मुंबई (तपोवन) नांदेड-मुंबई (राज्यराणी) मुंबई, पुण्याचे ...

रेल्वे फुल्ल, मुंबईसाठी आरक्षण मिळेना
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
नांदेड-पनवेल
आदिलाबाद-मुंबई (नंदीग्राम)
सिकंदराबाद-मुंबई (देवगिरी)
नांदेड-पुणे (साप्ताहिक)
नांदेड-अमृतसर (सचखंड)
नांदेड-मुंबई (तपोवन)
नांदेड-मुंबई (राज्यराणी)
मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना
मुंबई तसेच पुणे येथून परभणी, जालना, नांदेड येण्यासाठीचे व याच भागातून परत जाण्याचे आरक्षण पुढील ४ ते ५ दिवसांसाठी फुल्ल झाले आहे. याच काळात महालक्ष्मीचा सण आहे. यामुळे गावी परतणाऱ्या व सण झाल्यावर परतीच्या प्रवासाला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र, आरक्षण मिळत नसल्याने खासगी ट्रॅव्हल्स धारकांकडून अतिरिक्त भाडे आकारले जात आहे. पुणे तसेच मुंबई येथे जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली जात आहे.
हैद्राबाद मार्गावर गर्दी कमीच
परभणी येथून हैदराबाद, तेलंगणा, आंध्रप्रदेश जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, या भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे. तिरुपतीकडे जाण्यासाठी केवळ हैदराबादपर्यंत जाणारे प्रवासी दिसून येतात. या व्यतिरिक्त फारसा गर्दा हैदराबाद मार्गावर सुरु असलेल्या रेल्वेला नसतो.
ना मास्क, ना फिजिकल डिस्टंसिंग
दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या परभणी, नांदेड मार्गे धावणाऱ्या विशेष एक्सप्रेस रेल्वेमध्ये तिकीट तपासणी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते. प्रवाशांनी मास्क घातला आहे का नाही तसेच फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जाते का याबाबत कोणीही पाहत नाही. रेल्वे पोलीस केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रात्रीच्या वेळी रेल्वे डब्यांमध्ये बंदोबस्त ठेवतात. या व्यतिरिक्त कोणीही या नियमांची तपासणी करत नाही. यामुळे अनेक प्रवासी हे नियम पाळत नसल्याचे दिसून येतात.