कोविड केअर सेंटरमध्ये ना जेवणाची वेळ, ना नाश्त्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST2021-05-20T04:18:12+5:302021-05-20T04:18:12+5:30

शहरातील एकूण कोविड केअर सेंटर - ३ या सेंटर्समध्ये सध्या दाखल रुग्ण - ४१ अशा आहेत जेवण मिळण्याच्या वेळा ...

No lunch, no breakfast at Covid Care Center | कोविड केअर सेंटरमध्ये ना जेवणाची वेळ, ना नाश्त्याची

कोविड केअर सेंटरमध्ये ना जेवणाची वेळ, ना नाश्त्याची

शहरातील एकूण कोविड केअर सेंटर - ३

या सेंटर्समध्ये सध्या दाखल रुग्ण - ४१

अशा आहेत जेवण मिळण्याच्या वेळा

कल्याण मंडपम : ८.३० वाजता नाष्टा, दोन वाजता जेवण, रात्री आठ ते नऊच्या दरम्यान जेवण

अक्षदा कोविड सेंटर : ८.३० वाजता नाश्ता, २.३० वाजता जेवण, रात्री ८ ते ८.३० च्या मध्ये जेवण

रेणुका कोविड सेंटर : ८.३० वाजता नाश्ता, २.३० वाजता जेवण, रात्री ८ ते ९ च्या मध्ये जेवण

चहा, काढ्यासाठी रेणुका सेंटरला मशीन

शहरातील रेणुका कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना दिवसभरात चहा, काॅफी, काढा घेण्यासाठी वेगवेगळ्या मशीन बसविण्यात आल्या आहेत. येथे पाहिजे तेव्हा रुग्ण चहा, काढा घेऊ शकतात.

नाश्ता, जेवण चांगले

शहरातील तीन कोविड केअर सेंटरमध्ये मिळणारे जेवण, नाश्ता चांगल्या दर्जाचे आहे. परंतु, बऱ्याच वेळा ते जेवण, नाश्ता ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा येते. यासाठी नियोजित केलेल्या वेळी जेवणाचा पुरवठा करावा, अशी मागणी आहे.

रेणुका केअर सेंटर सध्या बंद

शहरातील तीन केअर सेंटरपैकी रेणुका केअर सेंटर सध्या रुग्ण संख्या घटल्याने बंद आहे, तर अक्षदा येथे केवळ २१ आणि कल्याण मंडपम येथे २० रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: No lunch, no breakfast at Covid Care Center