शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिकविम्यासह अतिवृष्टीच्या अनुदानाची मागणी; गोदापात्रात स्वाभिमानीचे जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 16:35 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात करण्यात आले आंदोलन

- विनायक देसाई पूर्णा ( जि. परभणी) : राज्य सरकारने विमा कंपनीला रक्कम दिलेली नाही. त्यामुळे विमा कंपनीने २०२४ खरीप हंगामातील विमा शेतकऱ्यांना दिला नाही. शिवाय अतिवृष्टी अनुदानाचीही प्रतिक्षा आहे. मात्र, याकडे लक्ष दिले जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले. 

२०२४ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी झाली व शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले, त्यामुळे पिक विमा कंपनीने सर्वे करून शेतकऱ्यांना पिकविमा अग्रिम मंजूर केली. शासनाने अतिवृष्टीचे अनुदान मंजूर केले. नुकसान होवून दोन ते तीन महिने उलटून गेले तरी पिक विमा अग्रीम व शासनाची मदत शेतकन्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही. ती तात्काळ जमा करावी,  नाफेड, सिसिआय अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची हेटाळणी थांबवावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गादावरी पात्रात जलसमाधी आंदोलन करून लक्ष वेधले. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडत नाही तोपर्यंत आंदाेलन सुरूच राहील असा पवित्रा घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, मुंजा  लोढे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, नरसिंग पवार, नामदेव काळे, पंडित भोसले, कैलासराव काळे, विठ्ठल चौकट, रामा दुधाटे, नागेश दुधाटे, लक्ष्मण लांडे, विजय कोल्हे, अंगद काजळे, विष्णु शिंदे आदींनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  रेस्क्यू पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. दरम्यान तहसीलदार यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरूच होता.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी