एलबीटी वसुलीसाठी मनपाची १५ नोव्हेंबरपासून धडक मोहिम

By Admin | Updated: November 3, 2014 15:07 IST2014-11-03T15:07:17+5:302014-11-03T15:07:17+5:30

व्यापार्‍यांना स्थानिक संस्था कराचे विवरण पत्र भरण्यास वेळोवेळी मुदत देवूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या एलबीटी विभागाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून एलबीटी वसुली व तपासणीची धडक मोहिम

NMC to launch LBT recovery from Nov 15 | एलबीटी वसुलीसाठी मनपाची १५ नोव्हेंबरपासून धडक मोहिम

एलबीटी वसुलीसाठी मनपाची १५ नोव्हेंबरपासून धडक मोहिम

 नांदेड: शहरातील व्यापार्‍यांना स्थानिक संस्था कराचे विवरण पत्र भरण्यास वेळोवेळी मुदत देवूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या एलबीटी विभागाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून एलबीटी वसुली व तपासणीची धडक मोहिम हातीघेण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गुलाम सादेक यांनी दिली. 
स्थानिक संस्था कर नियम २0१0 मधील नियम २९ (३) अन्वये नमुना ड- एक व नमुना ड - दोन मधील तरतुदीनुसार सर्व व्यापार्‍यांनी त्यांच्या प्रतिष्ठानाची वार्षिक विवरणपत्रे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. यासाठी शहरातील व्यापार्‍यांना वेळोवेळी नोटीसा देण्यात आल्या. 
३१ ऑक्टोबर पर्यंत विवरणपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या मुदतवाढीला काही व्यापार्‍यांनी दुर्लक्ष करीत एलबीटी भरण्यास व विवरण पत्र सादर करण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे अशा व्यापार्‍यांवर कारवाई करण्यासाठी १५ नोव्हेंबरपासून कागदपत्रांची तपासणी व जागेची झडती, लेखी पुस्तके आणि माल जप्त करणे, दुकानांना टाळे ठोकणे आदी कारवाई करण्यात येणार आहे. /
/एलबीटी चुकविण्यासाठी काही व्यापार्‍यांनी दैनंदिन व्यवहाराचा हिशोबच गुंडाळला असून कच्या बीलाचा वापर सुरू केला आहे. एलबीटी न भरणार्‍या व्यापार्‍यांचा शोध घेण्यासोबत व्यवहाराच्या नोंदी तपासण्यात येणार आहेत. 
महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करण्यासाठी गुंठेवारी, मालमत्ता करवसुली, अनाधिकृत बांधकाम विरोधी मोहिम व एलबीटी वसुलीची मोहिम धडकपणे राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन मिळत नाही. तसेच तिजोरीत पैसे राहत नाहीत. त्यामुळे यापुढे वसुलीची मोहिम अधिक तीव्र करण्यात येईल. 
एलबीटी वसुलीसाठी आमचे कर्मचारी व्यापार्‍यांपर्यंत पोहचत नाहीत. तर काही व्यापारी एलबीटी चुकवितात. मात्र एलबीटी हा व्यापार्‍यांसाठी सवरेत्तम पर्याय आहे. त्यांनी एलबीटी वेळेवर भरून त्यांच्यावरील कारवाई टाळली पाहिजे, असे आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: NMC to launch LBT recovery from Nov 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.