५४ गावांसाठी कोरोना केअर सेंटरची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST2021-05-15T04:16:35+5:302021-05-15T04:16:35+5:30

वालूर येथील या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५४ गावांचा समावेश आहे. या गावातील जवळपास २० हजार नागरिकांच्या आरोग्याची काळजी १४ ...

Need for Corona Care Centers for 54 villages | ५४ गावांसाठी कोरोना केअर सेंटरची गरज

५४ गावांसाठी कोरोना केअर सेंटरची गरज

वालूर येथील या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५४ गावांचा समावेश आहे. या गावातील जवळपास २० हजार नागरिकांच्या आरोग्याची काळजी १४ उपकेंद्रसह या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. विशेष म्हणजे वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४२ कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या स्थिती कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वालुर येथे कोरोना केअर सेंटर असणे आवश्यक आहे. याबाबत नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा प्रशासन, पालकमंत्री व राज्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मात्र येथे कोरोना केअर सेंटर उभारण्यासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी वालूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ वालूर येथे ५० ऑक्सिजन बेडसह १५० खाटांचे कोरोना केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी वालूरसह ५० गावातील ग्रामस्थांमधून होत आहे.

Web Title: Need for Corona Care Centers for 54 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.