महापालिकेची स्थगित झालेली भरती प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:17 IST2021-05-14T04:17:21+5:302021-05-14T04:17:21+5:30
परभणी : येथील महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत अचानक स्थगित केलेली भरती प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ११ मेपासून सुरू करण्यात आली ...

महापालिकेची स्थगित झालेली भरती प्रक्रिया सुरू
परभणी : येथील महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत अचानक स्थगित केलेली भरती प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ११ मेपासून सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागात १२८ पदे तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत. यासाठी २९ एप्रिल ते १५ मे या कालावधीत उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीला उपस्थित राहण्याबाबत कळविले होते. या प्रक्रियेला प्रतिसाद मिळत असतानाच अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या आठ दिवस आधीच ७ मे रोजी महापालिकेने मुलाखती बंद केल्याची नोटीस काढली. अचानक भरती प्रक्रिया स्थगित केल्यामुळे उमेदवारांची मोठी गैरसोय झाली. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी हा प्रकार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या निदर्शनाला आणून दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात मनपा आयुक्तांना भरती प्रक्रिया राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ११ मेपासून कंत्राटी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.