१८ दुकानांना लावला महापालिकेने दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST2021-05-19T04:17:50+5:302021-05-19T04:17:50+5:30
आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार व सहायक आयुक्त अल्केश देशमुख यांच्या नियंत्रणाखाली नानलपेठ, कोतवाली पोलीस यांच्यासोबत संयुक्त ...

१८ दुकानांना लावला महापालिकेने दंड
आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार व सहायक आयुक्त अल्केश देशमुख यांच्या नियंत्रणाखाली नानलपेठ, कोतवाली पोलीस यांच्यासोबत संयुक्त कारवाई करत कच्छी बाजार, जनता मार्केट, शिवाजी चौक, जाम नाका येथे १६, १७, १८ मे अशा तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, धुमाळ, विशाल बहात्तरे, तिब्बतवाड, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, भीमराव लहाने, प्रकाश काकडे, मोहन वाघमारे यांचा सहभाग होता.
विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी
शहरात महापालिकेच्यावतीने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे. यासाठी जिंतूर रस्त्यावरील जांब नाका, मध्यवस्तीत गांधी पार्क आणि वसमत रोडवर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तपासणी सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये वसमत रोडवर फिरणाऱ्या नागरिकांची टेस्ट करण्यात आली. ही कारवाई महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. गांधी पार्क येथील टेस्ट कॅम्प हे शिवाजी महाराज चौक येथे लावून कॅम्प सुरू करण्यात आले आहे. यासाठी स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, लक्ष्मण जोगदंड, मोहम्मद शादाब हे काम पाहत आहेत.