महापालिकेचे कामकाज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:39+5:302021-09-02T04:38:39+5:30

परभणी : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी येथील महानगरपालिकेतील ...

Municipal Corporation closed | महापालिकेचे कामकाज बंद

महापालिकेचे कामकाज बंद

परभणी : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी येथील महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे दिवसभर मनपाचे कामकाज बंद राहिले.

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करीत असताना एका माथेफिरूने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची बोटे पूर्णपणे तुटून पडली आहेत. या गंभीर घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटले असून, येथील महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एकत्र येत घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तसेच दिवसभर कामकाज बंद ठेवून या प्रकरणातील आरोपींस अटक करण्याची मागणी करण्यात आली.

विविध संघटनांकडून निषेध

ठाणे येथील या घटनेचा विविध संघटनांनी निषेध नोंदविला. मराठवाडा नप व मनपा कामगार कर्मचारी युनियनने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले असून, ही घटना निंदनीय असल्याचे म्हटले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या हल्ल्यामुळे प्रशासनाचे मनोधैर्य खचते तेव्हा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अध्यक्ष माधुरी क्षीरसागर, जालिंदर कांबळे, सय्यद अब्बास हाश्मी, सुलभा सरदेशपांडे, भगवान कनकुटे आदींनी केली आहे.

Web Title: Municipal Corporation closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.