शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

वारीत गेलेल्या गंगाखेडच्या मृदुंग वादकाचा पंढरपूरजवळ विहिरीत बुडून मृत्यू, घातपाताचा संशय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:26 IST

कुटुंबीयांना या प्रकरणात घातपाताचा संशय : गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू

गंगाखेड (जि. परभणी) : तालुक्यातील मसला येथील रहिवासी असलेल्या तरुण मृदुंग वादक गोविंद विनायक शिंदे (वय १५) या वारकऱ्याचा पंढरपूरनजीक एका शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली. मात्र, कुटुंबीयांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केल्याने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पंढरपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू होती.

गंगाखेड शहरातील श्री संत सोपान काका महाराज इसादकर यांच्या व दिंडी क्रमांक १६ ठाकूरबुवा यांच्या दिंडीतील वारकरी मृदुंग वादक गोविंद विनायक शिंदे या १५ वर्षीय वारकऱ्याचा पंढरपूरनजीक १४ किलोमीटरवरील बंडी शेगाव परिसरात एका शेतात गुरुवारी सकाळी १० वाजता अंघोळीसाठी विहिरीवर गेल्यानंतर विहिरीत पडून अपघाती मृत्यू घडल्याची घटना घडली. या घटनेने श्री संत सोपान काका महाराज इसादकर व ठाकूर बुवा दिंडीतील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली. घटनेचे वृत्त कळताच गंगाखेड तालुक्यातील मसला येथील मयत तरुण वारकरी गोविंद विनायक शिंदे यांचे नातेवाईक व गावातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मयताचे नातेवाईक व गावकऱ्यांना मृत्यूबाबत काही संशयास्पद आढळल्याने त्यांनी थेट पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. मयत वारकरी विनायक यांचा मृत्यू अपघाती नसून, घातपाताचा प्रकार असल्याची शंका त्यांनी पोलिसांना उपस्थित केली. दरम्यान, पंढरपूर ग्रामीण रुग्णालयात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.

खासदार संजय जाधव यांनी घेतली कुटुंबीयांची भेटसंपूर्ण घटनेदरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात भेट देऊन मृताच्या कुटुंबीयांच्या भावना जाणून घेतल्या. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे व ग्रामीण रुग्णालयात तरुण वारकऱ्याच्या मृत्यूबाबत गुन्हा नोंद करण्याची पोलिस ठाण्यात कारवाई सुरू होती.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025parabhaniपरभणी