भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST2021-07-27T04:19:01+5:302021-07-27T04:19:01+5:30
परभणी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कर्जमाफी योजनेत माफी मिळालेल्या ...

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन
परभणी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
कर्जमाफी योजनेत माफी मिळालेल्या नवीन शेतकऱ्यांना अद्याप कर्ज वाटप झाले नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जुन्या कर्जाचे पुनर्गठण करून नवीन पीक कर्ज द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे, केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांना मवाली ठरविणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी, लोअर दुधना प्रकल्पाची कार्यालये आणि गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांची कार्यालये सेलू व परभणी येथे स्थलांतरित करावी, इंद्रायणी पुनरुज्जीवन योजनेमुळे ४ वर्षांपासून बाधित असलेल्या वडगाव, भारस्वाडा, इंदेवाडी येथील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, आंदोलनात कॉ.राजन क्षीरसागर यांच्यासह ज्ञानेश्वर काळे, ओंकार पवार, प्रकाश गोरे, शेख अब्दुल, आसाराम जाधव, नवनाथ कोल्हे आदी सहभागी झाले होते.