बाह्यवळण रस्त्याच्या कामाला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:53+5:302021-04-13T04:16:53+5:30

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या पाथरी : रागाच्या भरात एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ एप्रिल ...

Moment of bypass road work | बाह्यवळण रस्त्याच्या कामाला लागेना मुहूर्त

बाह्यवळण रस्त्याच्या कामाला लागेना मुहूर्त

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

पाथरी : रागाच्या भरात एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ एप्रिल रोजी खेडुळा येथे घडली. सुरेश तात्याराव शेळके (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. वादातून त्याने शेतातील जांभळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती माधवराव शेळके यांनी पाथरी पोलिसांना दिली. त्यावरून अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बडवणी शिवारात कडबा जळाला

गंगाखेड : तालुक्यातील बडवणी शिवारातील शेतात रचून ठेवलेल्या कडब्याच्या गंजीला आग लागल्याची घटना ८ मार्चरोजी घडली. या आगीत शेतकरी ज्ञानदेव मुंडे यांचे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंडे यांनी त्यांच्या पशूंना भविष्यात कडबा लागेल, यासाठी ५ हजार कडब्याची गंजी रचून ठेवली होती. त्यास आग लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा

जिंतूर : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नृसिंहानंदा सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी जमीयत उलमा-ए-हिंद मोहमूद मदनी यांच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर मराठवाडा सचिव मौलाना अब्दुल जलील, मौलाना तजमुल अहमद खाँ, मुफ्ती मुश्दीक मो. सिराज नदवी, मौ. जकरीया मुफ्ती अ. हन्नन आदींची नावे आहेत.

ठिकाण बदलून आठवडी बाजार भरला

सोनपेठ : प्रशासनाने आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही सोमवारी सोनपेठ शहरात ठिकाण बदलून आठवडी बाजार भरविण्यात आला. सोनपेठ शहरातील नियमित बाजार भरणाऱ्या ठिकाणाला टाळून सोमवारी विक्रेत्यांनी बायपास रस्त्यावर ठाण मांडून बाजार भरविला. यावेळी मोठी गर्दी झाल्याचे पाहावयस मिळाले. प्रशासनाच्यावतीने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन बाजारात झाले होते. याबाबत नगरपालिकेने कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, पालिकेचे पथक बाजार परिसरात फिरताना आढळून आले नाही. परिणामी गर्दी कायम होती.

Web Title: Moment of bypass road work