मोकाट जनावरांचा मानवतमध्ये उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST2021-02-15T04:16:05+5:302021-02-15T04:16:05+5:30

मानवत : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून, ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ...

Mokat animal infestation in humans | मोकाट जनावरांचा मानवतमध्ये उपद्रव

मोकाट जनावरांचा मानवतमध्ये उपद्रव

मानवत : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून, ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मानवत शहरातील मुख्य रस्त्यावरील नगरपालिका, भाजी मंडई, मंत्री गल्ली, पोलीस ठाणे, पाथरी नाका, आठवडा बाजार परिसर, बसस्थानक या भागांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. या जनावरांना त्यांचे मालक बेजबाबदारपणे सोडून देत आहेत. त्यामुळे आठवडा बाजार, भाजी मंडई आणि मंत्री गल्लीतही ही जनावरे ठाण मांडून बसतात. काहीवेळा अचानकच ही जनावरे पळत सुटतात. त्यांना हाकलणाऱ्या नागरिकांच्या अंगावरही धावून जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागातील रस्ते अगोदरच फळ विक्रेत्यांनी व्यापल्याने त्यांची रुंदी कमी झाली आहे. अशातच भररस्त्यात जनावरे बसत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे, शिवाय किरकोळ अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांच्या मालकांवर गेल्या काही दिवसांपासून कारवाई केलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Mokat animal infestation in humans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.