चोरट्यांनी पळविला मोबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:17+5:302021-02-05T06:03:17+5:30

गंगाखेड शहरातील दत्त मंदिर परिसरातील रहिवासी मुख्याध्यापक पांडुरंग शंकरराव चिलगर हे २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास होळकर ...

Mobile stolen by thieves | चोरट्यांनी पळविला मोबाइल

चोरट्यांनी पळविला मोबाइल

गंगाखेड शहरातील दत्त मंदिर परिसरातील रहिवासी मुख्याध्यापक पांडुरंग शंकरराव चिलगर हे २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास होळकर चौक, भाजी मार्केट परिसरातून भाजीपाला खरेदी करत होते. तेव्हा तिथे आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी पांडुरंग चिलगर यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाइल चोरून नेला. मोबाइल चोरीस गेल्याची बाब काही वेळाने चिलगर यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी तिन्ही संशयित चोरट्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नसल्याने २८ जानेवारी रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही चोरट्यांविरुद्ध मोबाइलच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार रंगनाथ देवकर हे करीत आहेत. दरम्यान, गंगाखेड शहरातील भाजी मार्केट परिसरातून दर शनिवार व सोमवार रोजी भरणाऱ्या आठवडी बाजारातून किमती मोबाइलचोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोबाइलचोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहर व तालुक्यातील नागरिकांतून केली जात आहे.

Web Title: Mobile stolen by thieves