शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलने मेमरी घालविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST

परभणी : मोबाइलच्या क्रांतीनंतर मोबाइलवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. ही डिपेंडन्सी नागरिकांच्या स्मरणशक्तीसाठी घातक ठरू लागली असून, पाठांतराचे ...

परभणी : मोबाइलच्या क्रांतीनंतर मोबाइलवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. ही डिपेंडन्सी नागरिकांच्या स्मरणशक्तीसाठी घातक ठरू लागली असून, पाठांतराचे प्रमाण कमी झाल्याने दैनंदिन जीवनावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पूर्वी दूरध्वनी क्रमांक असो अथवा एखादी महत्त्वाची बाब मुखपाठ असायची; परंतु आता मोबाइलचा वापर वाढला तसा मेंदूचा वापर कमी होत चालला असून, ही बाब धोकादायक ठरू शकते.

असे का होते?

एखाद्या व्यक्तीवर अथवा यंत्रावर अवलंबून राहिल्यानंतर स्वतःची कार्यक्षमता कमी होते. असाच प्रकार मोबाइलच्या बाबतीत होत आहे.

मोबाइलमध्ये नावासह क्रमांक नोंदविलेले असल्याने ते आपण जास्त गांभीर्याने घेत नाहीत. परिणामी, मोबाइल क्रमांक मुखपाठ राहत नाहीत.

त्याचप्रमाणे जवळच्या नातेवाइकांचे वाढदिवस, दैनंदिन करावयाची कामे या बाबीही मोबाइलमध्ये नोंद केल्या जात आहेत. त्यामुळे स्वतःच्या शक्‍तीचा वापर कमी होतो. परिणामी याबाबी स्मरणात राहत नाहीत.

हे टाळण्यासाठी

स्वतःची स्मरणशक्ती तल्लख करणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना स्वावलंबनाचे धडे द्यावेत. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी छोट्या-छोट्या ट्रिकचा वापर करावा. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी असलेल्या छोट्या छोट्या खेळांचा वापर मुलांकडून करून घ्यावा, यंत्रांचा अनावश्‍यक वापर टाळावा.

माणसाची डिपेंडन्सी वाढली की, आपोआपच स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो. स्वतःच्या मेमरीचा कमी वापर केल्याने असे प्रकार होतात. त्यामुळे अनावश्यक बाबींसाठी यंत्रांवर विसंबून राहू नये, प्रत्येकाला दोन स्मरणशक्ती असतात. एक शॉर्ट टाइम आणि एक परमनंट मेमरी. यंत्रांच्या वाढत्या वापरामुळे परमनंट मेमरीमध्ये काही गोष्टी ठेवण्याची सवय मोडत आहे. त्यामुळे स्वावलंबन वाढवून मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-डॉ. जगदीश नाईक, मानसोपचारतज्ज्ञ