शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनास संमिश्र प्रतिसाद; दुपारनंतर काही बस सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 14:44 IST

सकाळी ११ वाजेनंतर तुरळक प्रमाणात बस सुरू झाल्या असल्या तरी अनेक प्रवाशांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागला.

परभणी : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, यासह इतर मागण्यासाठी एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनातपरभणी विभागातील एसटी कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या परिणामी प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागला.

शासनाने महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, वार्षिक वेतनवाढीच्या व घरभाडे भत्त्याच्या वाढीव दराची थकबाकी द्यावी, यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने  राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी सकाळपासून आंदोलन सुरू केले. आंदोलनात जिल्ह्यातील बसचालक, वाहकांसह कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सकाळपासून अनेक बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. यावेळी परभणी विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी ग्रामीण बस स्थानक, मध्यवर्ती कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलन केले. परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी या आगारातून बस रद्द झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. दरम्यान सकाळी ११ वाजेनंतर तुरळक प्रमाणात बस सुरू झाल्या असल्या तरी अनेक प्रवाशांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागला.

राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र याकडे पाकिस्तानी दुर्लक्ष होत गेले. शासनाने आता तरी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊ मागण्या मान्य कराव्यात.-गोविंद वैद्य, जिल्हाध्यक्ष, एसटी कामगार संघटना

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटीagitationआंदोलन